सानेगुरुजी परिसरात गावठी बनावटीचे पिस्तुल विक्री करणाऱ्या अटक…

0
90

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील रावजी मंगल कार्यालय, सानेगुरुजी येथे आज (सोमवार) बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तुल विक्री करण्यास आलेल्या एकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि दोन जिवंत राऊंड असा एकूण ५० हजार ४०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अजित सुखदेव कांबळे (वय २४, रा. साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे.

साने गुरुजी वसाहतीमधील अजित कांबळे याच्याकडे गावठी बनावटीची पिस्तूल असून ती विक्री करण्यासाठी तो आज रावजी मंगल कार्यालय परिसरात येणार असल्याची गोपीनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या परिसरात सापळा लावून अजित कांबळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५० हजार रूपये किंमतीचे गावठी बनावटीचे एक पिस्तुल आणि ४०० रुपये किंमतीचे दोन जिवंत राऊंड असा एकूण ५० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. किरण भोसले, पोलीस अमंलदार नेताजी डोंगरे, श्रीकांत मोहीते, वैभव पाटील, उत्तम सडोलीकर, रणजीत कांबळे, संजय पडवळ, संतोष पाटील, रणजीत पाटील, रफिक आवळकर तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अमर वासुदेव यांनी केली.