सुगंधी गुटख्याचा साठा व विक्री करणाऱ्या दोघांना अटक

0
116

कोल्हापूर (प्रतिनिधी) : टाकाळा येथील माळी कॉलनी व कळंबा येथील दादू चौगुलेनगर येथे सुगंधी गुटख्याचा साठा व विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. सखाराम श्रीपती सावंत (वय ३१, रा. माले कॉलनी, टाकळा) संतोष अण्णाप्पा कुंभार (वय ३०, रा. दादू चौगुलेनगर, कळंबा) अशी त्यांची नावे आहेत.  त्याच्याकडून सुमारे सव्वा लाख रुपये किंमतीचा गुटखा पानमसाला व सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केला. ही कारवाई राजारामपुरी पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, टाकळा येथील माळी कॉलनी व कळंबा येथील दादू चौगुलेनगर मध्ये गुटख्याची बेकायदेशीर विक्री व साठा होत असल्याची माहिती राजारामपुरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी रात्री या दोन्ही ठिकाणी छापा टाकला. यावेळी याठिकाणी विविध कंपन्यांचा गुटखा पान मसाला, सुगंधित तंबाखू, सुपारी असा सुमारे सव्वा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.