बेकायदेशीररीत्या घरगुती वापराचा गॅस वाहनात भरणाऱ्याला अटक…

0
103

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शाहूनगर येथे घरगुती गॅस वाहनात भरणाऱ्या एकाला राजारामपुरी पोलिसांनी काल (शनिवार) रात्री उशिरा अटक केली. वीरभद्र विरय्या हिरेमठ (वय ४१, रा. शाहूनगर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून सात हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूनगर येथे घरगुती वापराचा गॅस वाहनांमध्ये बेकायदेशीररीत्या भरला जात असल्याची माहिती राजारामपुरी  पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी काल रात्री उशिरा छापा टाकला. याठिकाणी घरगुती गॅस भरणाऱ्या वीरभद्र हिरेमठ याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून सिलेंडर गॅस सिलेंडरच्या २ टाक्या, इलेक्ट्रिक वजन काटा, इलेक्ट्रिक मोटर आणि रबरी पाईप असे साहित्य जप्त केले आहे.