वाहनात बेकायदेशीर गॅस भरणाऱ्याला अटक…

0
114

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूरातील मंगळवारपेठ येथे  घरगुती गॅस बेकायदेशीररित्या वाहनात भरणाऱ्याला जुना राजवाडा पोलिसांनी आज (गुरुवारी) सायंकाळी अटक केली. प्रदिप महादेव सनगर (वय २१, रा. मंगळवारपेठ ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीसांनी त्याच्याकडून ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवार पेठेतील प्रदीप सनगर हा घरगुती वापरायचा गॅस बेकायदेशीररित्या वाहनांमध्ये भरत असल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आज सायंकाळी या ठिकाणी छापा टाकला. त्याच्याकडून घरगुती वापराच्या भरलेले सहा सिलेंडर टाक्या,३ रिकाम्या टाक्या, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, इलेक्ट्रिक मोटर आणि अन्य साहित्य  जप्त केले