तुरूंगातून बाहेर आल्यानंतर अर्णब गोस्वामींचा उद्धव ठाकरेंना इशारा

0
62

मुंबई (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकार आणि रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यातील संघर्ष चिघळणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कारण अर्णब यांना बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. त्यानंतर तुरूंगातून बाहेर आल्यानंतर अर्णब यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे.  

 

अर्णब यांनी आपल्या ट्विट म्हटले आहे की, उद्धव ठाकरे तुम्ही मला जुन्या प्रकरणात अटक केली आणि माझी माफीही मागितली नाही. खेळ तर आता सुरू झाला आहे.   आता प्रत्येक भाषेत रिपब्लिक टीव्ही सुरू करणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्येही आपली उपस्थिती असेल. मी तुरूंगाच्या आतूनही वाहिनी सुरू करेन आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही, असेही त्यांनी छातीठोकपणे  म्हटले आहे.