अर्णब गोस्वामींना दणका : ‘ऑफकॉम’ ने ठोठावला लाखोंचा दंड

0
168

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसारण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना युकेमधील कम्युनिकेशन्स नियामक कार्यालयाने (ऑफकॉम)  तब्बल २० हजार पौंड (१९ लाख ७३ हजार रुपये) दंड ठोठावला आहे.

वर्ल्डव्यू मीडिया नेटवर्ककडे युकेमधील रिपब्लिक भारताची भागीदारी आहे.  ६ डिसेंबरला रिपब्लिक भारतचा ‘पूंछता है भारत’ कार्यक्रम प्रसारित झाला होता. या कार्यक्रमात पाकिस्तानी नागरिकांविरोधात द्वेषयुक्त आणि भडकवणारी भाषा वापरत प्रसारणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप  केला आहे. ऑफकॉमने पुन्हा तो कार्यक्रम प्रसारित न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अर्णब गोस्वामी यांनी भारताच्या चांद्रयान २ मोहिमेसंदर्भातील कार्यक्रमात भारताच्या अवकाश तसेच तांत्रिक विकासाची पाकिस्तानशी तुलना केली होती. पाकिस्तानकडून भारताविरोधात होणाऱ्या दहशतवादी कारवायांचाही त्यात उल्लेख करण्यात आला होता.