रेखा जरे खूनप्रकरण : अखेर पत्रकार बाळ बोठे याला अटक

0
52

अहमदनगर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला अटक करण्यात आली आहे. आज (शनिवार) पहाटे बोठे याला पोलिसांनी हैदराबादमधून ताब्यात घेतले .  मागील तीन महिन्यांपासून बोठे  याच्या मागावर पोलीस होते. पण तो गुंगारा देत होता. अखेर  त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

पाच दिवसांपासून पोलिसांची सहा पथके बोठेच्या हालचालींवर लक्ष ठेवून होती. पोलिसांना माहिती होऊन नये म्हणून हॉटेलमधील रुमचा दरवाजा बाहेरून बंद करण्यात आला होता. अखेर शनिवारी पहाटे बोठे याला पोलिसांनी हैदराबादेतून  ताब्यात घेतले.  

दरम्यान, बोठे फरार होताना त्याने त्याचे दोन्ही मोबाइल घरीच ठेवले होते. पोलिसांनी हे मोबाइल जप्त करून त्याच्या शोधासाठी विविध ठिकाणी ५ पथके रवाना केली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील बालिकाश्रम रस्त्यावरील बोठे याच्या बंगल्याची झडतीही घेतली होती. झडतीत पोलिसांना बोठे याचे रिव्हॉल्वर आढळून आले होते. बोठे याच्याकडे शस्त्रपरवाना होता. तसेच त्याच्या  काही वस्तूही मिळून आल्या होत्या.  त्यामुळे तपासाला मदत होणार आहे.