खणाच्या साडीत अप्सरा खुलली : दिलखेचक फोटोंवर चाहते फिदा   

0
98

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी चित्रपटांसोबतच ती सोशल मीडियावरदेखील सक्रिय असते. ती आपले दिलखेचक फोटो पोस्ट करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. बोल्ड फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते.

साडीमधील मनमोहक फोटोंमधून सोनालीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने हिरव्या रंगाची खणाची साडी परिधान करत फोटोशूट केले आहे. हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर देखील शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंना चाहत्यांकडून मोठी दाद  मिळत आहे.