यंत्रमाग कामगार महामंडळ स्थापन करण्यास मान्यता  

0
55

इचलकरंजी (प्रतिनिधी) : बांधकाम कामगार महामंडळाच्या धर्तीवर यंत्रमाग कामगार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय आज (बुधवार) मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. महामंडळाची मागणी गेल्या १५ ते २० वर्षापासून प्रलंबित होती. याबाबत बैठक घेण्यासाठी राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांनी पाठपुरावा केला होता. त्यास यश आले आहे.

कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज सकाळी ११ वाजता मंत्रालयात राज्यातील  वस्त्रोद्योग भागातील लोकप्रतिनिधी व यंत्रमाग मालक संघटना व कामगार संघटना तसेच इतर वस्त्रोद्योगातील तज्ञ मंडळीसोबत बैठक घेतली. यापूर्वी ज्या तीन समित्या नेमल्या होत्या. त्या समितीचा व सध्या असणाऱ्या नवीन सूचनेचा विचार करून यंत्रमाग कामगार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला कृषीमंत्री दादा भुसे, आ. प्रणिती शिंदे, आ. अनिल बाबर, आ. प्रकाश आवाडे, आ. सुभाष देशमुख, आ. मुनीफ इस्माईल, माजी आमदार सुरेश हाळवणकर, नरसिंह अडम, अमित गाताडे, प्रधान सचिव विनिता वेदसिंगल, विकास आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, कामगार आयुक्त सुरेश जाधव आदीसह मालेगाव भिवंडी, सोलापूर, सांगली व इचलकरंजी येथील यंत्रमाग मालक संघटना व कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.