शिरोली पोलीस ठाण्यात राजेश खांडवे यांची नियुक्ती 

0
543

टोप (प्रतिनिधी) :  शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांची स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर येथे बदली झाली.  तर त्यांच्या जागी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राजेश खांडवे यांनी गडचिरोली येथे नक्षली भागात सेवा बजावली आहे. त्यांनी गडचिरोली येथे ८ टीमच्या जवानांचे प्रतिनिधित्व करून अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवले.  या साहसी पराक्रमामुळे त्यांना २०१८ व २०२० या साली दोन शौर्य पदकानाने सन्मानीत केले आहे.  ते मूळचे बीड जिल्ह्यातील माजलगावचे असून त्यांची पहिली पोस्टिंग फेब्रुवारी २०१५ रोजी गडचिरोली येथे झाली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांची  २०१९ मध्ये शिरोली पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली. त्यांनी २०१९ व जुलै २०२१ ला आलेल्या महापुरात योग्य  नियोजन व खबरदारी घेत परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवले. महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे  बसवून गुन्हेगारी रोखण्याचा प्रयत्न  केला.