कोल्हापूर (प्रतिनिधी) : निवडणूक मग ती कोणतीही असली तरी महत्त्व असते ते निवडणूक आयोगाकडून दिल्या जाणाऱ्या चिन्हाला. प्रत्येक उमेदवार पक्षाचे चिन्ह नसेल तर आपल्या पसंतीचे चिन्ह मिळावे यासाठी धडपडत असतो. पण यावेळी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मजेशीर चिन्हे आयोगाने दिली आहेत. त्याची ग्रामीण भागात चर्चा सुरू आहे.

पाव, ब्रेड, सफरचंद, भाज्या, नेलकटर, कंगवा अशा एक ना अनेक मजेशीर चिन्हांचा यामध्ये समावेश आहे. जवळपास १९० चिन्हे निवडणूक आयोगाकडून जारी केली आहेत. सफरचंद, हिरवी मिरची, आले, फुलकोबी, ढोवळी मिरची, मका, आक्रोड, कलिंगड, संगणक, पेन ड्राईव्ह, माऊस, फोन चार्जर, स्वीच बोर्ड, पाव, ब्रेड टोस्टर, नेलकटर, ऑटोशिक्षा, फुगा, बॅट, बादली, केक, कॅमेरा, कॅरम बोर्ड, कोट, कंगवा, हिरा, कप-बशी, फुटबॉल, चष्मा, हॉकी, किटली, लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, पांगुळगाडा, टोपली, विहीर, सीटी, चमचा, अननस, दातांचा ब्रेश, पेस्ट आदी १९० चिन्हांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान यापैकी चिन्हे निवडताना उमेदवाराला पाच चिन्हे प्राधान्यक्रमानं दिली आहेत. त्यापैकी एक चिन्ह उमेदवाराला निवडावं लागणार आहे. दरम्यान, सध्या या निवडणुकीपेक्षा चिन्हांचीच चर्चा जोरात होताना दिसत आहे.