माजी सैनिकांनी निवृत्ती वेतनासाठी संपर्क साधण्याचे आवाहन

0
105

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारत, चीन, पाकिस्तान युध्दात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या माजी सैनिक, विधवा यांना निवृत्ती वेतन मिळत नाही. त्यांनी कोल्हापूर येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात १० एप्रिलपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

माजी सैनिक, विधवा यांनी आपले ओळखपत्र, डिस्चार्ज पुस्तक व युध्दात सहभागी झाल्याप्रित्यर्थ प्रदान केलेल्या नमुद पदकाच्या पुराव्यासह कार्यालयात भेटावे, असेही  आवाहन करण्यात आले आहे.