‘त्या’ योजनेसाठी ग्रंथालयांनी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

0
110

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोलकाता येथील राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या असमान निधी योजनेंसाठी ८ जानेवारीपर्यंत प्रस्ताव पाठवावा, असे आवाहन ग्रंथालय संचालिका शालिनी इंगोले यांनी केले आहे. शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी हा प्रस्ताव जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास पाठवावा लागणार आहे.

असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रंथालय संचालनालयाच्या वतीने अर्थसहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येतात. तरी इच्छुकांनी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहित मार्गाने व मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी, हिंदी भाषेत चार प्रतित संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास ८ जानेवारीपर्यंत पाठवावा, असे आवाहन इंगोले यांनी केले आहे.

असमान निधी योजनेतून ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम आणि इमारत विस्तार यासाठी निधी दिला जातो.