कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या वर्षीच्या महापुरात नुकसान झालेल्याची भरपाई अजूनही अनेकांना मिळालेली नाहीत. यासंबंधी आता महसूल प्रशासनाकडे तक्रारी वाढल्या आहेत. आठवड्यापूर्वी शहर आणि जिल्हा कृती समितीच्या शिष्टमंडळाने करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे यांचे लक्ष वेधले होते. यामुळे करवीर आणि शहरातील नुकसानग्रस्तांनी तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सन २०१९ मध्ये आलेला महापूर आणि अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले होते. अनेक नुकसानग्रस्तांना अजूनही भरपाईची रक्कम मिळालेली नाही. कोरोनाचे कारण सांगत प्रशासन टाळाटाळ करीत राहिले. आता कोरोना कमी झाल्याने भरपाई मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्तांची होती. त्यामुळे महसूल प्रशासनाने भरपाईपासून वंचितांनी तलाठी कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.