साळवण (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यातील मंदूर पैकी धुमाळवाडी येथील रवी विलास मार्गे (वय २४) या गंभीर जखमी वीज कर्मचाऱ्यावर कोल्हापुरातील सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, घरच्या बिकट परिस्थितीमुळे त्याला समाजातून मदतीची गरज आहे. दानशूर व्यक्ती, सामाजिक व विविध संस्थांनी मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

महावितरणच्या गगनबावडा उपविभागतील तिसंगी पैकी टेकवाडी येथे विद्युत लाईनवर काम करत असताना रवी मार्गे हा दि. १२ रोजी अपघात होऊन गंभीर जखमी झाला. रवी मार्गे हा होतकरू तरुण कंत्राटी कामगार म्हणून महावितरणमध्ये गेली ५ वर्षे काम करत आहे. त्याच्या घरी वडील, लहान भाऊ व पत्नी असे कुटुंब आहे. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. रवीचे लग्न नुकतेच दीड महिन्यापूर्वी झाले आहे. रवीच्या उपचारासाठी एकूण ५ लाख खर्च येणार असल्याने एवढी रक्कम उभी करणे कुटुंबाला  अशक्य आहे. त्यामुळे या महावितरणमधील कर्मचाऱ्यास समाजातील दानशूरांनी मदत करणे गरजेचे आहे.

गुगलपे नंबर- 8975794165, नाव- रवींद्र विलास मार्गे : बँक खाते नंबर -50100397284021,  IFSC CODE-HDFC0004800, HDFC BANK या ठिकाणी मदत पाठवावी, असे आवाहन त्याचे वडील विलास मार्गे यांनी केले आहे.