मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता डेल्टा व्हेरिएंटने डोके वर काढले आहे. डेल्टाच्या वाढत्या संसर्गाने राज्यात खळबळ उडाली आहे. डेल्टा व्हेरिएंटची रुग्णसंख्याही वाढू लागल्याने प्रशासनासह आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. त्यातच आता या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे आणखी ३ विषाणू आढळले आहेत.

संशोधकांना डेल्टा प्लस विषाणूच्या आणखी १३ उप-वंशांचा शोध लावला आहे. जो एवाय 1, एवाय 2 आणि एवाय 3 असे १३ पर्यंत आहे. डेल्टा व्हेरिएंटमध्ये म्युटेशन झाल्यावर डेल्टा प्लस व्हेरिएंट तयार होतो. डेल्टा व्हेरिएंटचा तरुणांना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच रूग्णांच्या संख्येतही मोठी वाढ होताना दिसून येत आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या ३ वेगवेगळ्या विषाणूंनी तज्ज्ञांची चिंता वाढवली आहे. आता या संसर्गजन्य डेल्टा प्लस व्हेरिएंटचे ३ वेगवेगळे प्रकार समोर येत आहे.  सुरुवातीला वयोवृद्ध लोक डेल्टा व्हेरिएंटचे बळी ठरत होते. आता या विषाणूचा तरुणांना जास्त धोका असल्याचे समोर येत आहे.