दहावीत चाटे समूहाच्या ६७३ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण
कोल्हापूर : दहावी परीक्षेच्या निकालात चाटे शिक्षण समुहाच्या कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या जिल्ह्यातील क्लासेस व स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. चाटे समूहाच्या ६७३ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. अनुज रमेश कोरके या विद्यार्थ्यांने १०० टक्के गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान मिळविला.
चाटे शिक्षण समूहाचे संचालक प्रा. डॉ. भारत खराटे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचे श्रेय नियोजनबद्ध परिश्रम, पालकांचे सहकार्य आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे आहे. दहावीच्या या टप्प्यावर मिळालेले यश साजरे करताना विद्याथ्यांच्या व पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसणारा आहे. या सर्व विद्यार्थी पालक आणि हितचिंतकांनी आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ करण्याचे समाधानही वेगळे आहे. दहावीनंतरही या सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल यशाच्या राजमार्गावर योग्य मार्गदर्शक म्हणून आम्ही सदैव तत्पर आहोत.
१०० ते ९८.०० टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी : कोरके अनुज (१०० टक्के), फातले आदित्य (९९.६०), माळी सई (९९.२०), पाटील आदिती (९९.०५), बडवे सम्राज्ञी (९८.८०), आडके समिक्षा (९८.८०), कमलाकर प्रणव (९८.६०), कबाडे सिद्धार्थ (९८.६०), तावसकर पल्लवी (९८.६०), मणेर रोहन (९८.४०४), साबळे सोहम (९८.४०), कुंभोजकर मिहीका (९८.४०), जाधव अनुजा (९८.२०५), वाघ आकांक्षा (९८.००), गडदे संस्कार (९८.००१६), दिसले श्रुती (९८.००), येवले प्रेरणा (९८.००), वडीगेकर विनित (९८.००), पाटील मनाली (१८.००)
विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल प्रा. मच्छिंद्र चाटे, प्रा. गोपीचंद चाटे व प्रा. डॉ. भारत खराटे, चाटे कोचिंग क्लासेस आणि चाटे स्कूलचे पदाधिकारी, सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.