कोतोली (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथे आज (मंगळवार) ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि तलाठी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने व्यावसायिक तसेच ग्रामस्थांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली.

यामध्ये गावातील संशयित रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात आलेले असे १५० जणांची टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये दोन लोक संशयित आढळून आले आहेत. त्यांना जवळच्या कोव्हिड सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. यावेळी तलाठी के. डी. पाटील, सरपंच विश्वास चव्हाण, डॉ. उमा लाकोळे, आरोग्यसेविका एस.व्ही.हजारे, आरोग्यसेवक एस. एस.गायकवाड, ग्रामसेवक संभाजी कराळे आदी उपस्थित होते.