गडहिंग्लजमध्ये प्लॅस्टिक विरोधी मोहीम तीव्र : २०० किलो प्लॅस्टिक जप्त

0
173

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : उपनराध्यक्ष महेश कोरी यांनी गडहिंग्लजकरांना केलेल्या आवाहनानुसार आज (रविवार) प्लॅस्टिक विरोधी मोहीम तीव्र केली होती.आज आठवडी बाजारात नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या समवेत संपूर्ण बाजार आणि सर्व दुकानात फिरून कोरी यांनी कडक तपासणी करत प्लॅस्टिकच्या पिशव्य जप्त करण्याची मोहीम राबविली.

या मोहीमेमध्ये जवळपास २०० किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. हे प्लॅस्टिक पर्यावरणाला तसेच आपणा सर्वांना हानिकारक असून त्याचा वापर टाळावा. प्लॅस्टिकच्या ऐवजी कापडी पिशवी वापरावी, असे आवाहन उपनगराध्यक्ष महेश कोरी यांनी केले. तसेच इथून पुढेही प्लॅस्टिक विरोधी मोहीम सुरूच राहणार असल्याचे सांगितले.