राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्यावर बलात्काराचा आरोप

0
412

पुणे  (प्रतिनिधी) : लैंगिक अत्याचारप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली. तृप्ती देसाई यांनी पीडितेसह आज (गुरूवार) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.   

पत्रकार परिषदेत पीडिता म्हणाली की,  विटेकर यांनी माझे अश्लील व्हिडिओ काढले आहेत.  ते वर्षभरापासून माझ्यावर अत्याचार करत आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. फक्त तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे. माझ्याकडे  त्यांच्याविरोधात पुरावे आहेत. शरद पवार यांच्यामुळे गुन्हा दाखल होणार नाही, असे राजेश विटेकर म्हणत असल्याचा दावाही पीडितेने यावेळी केला आहे.

दरम्यान,  सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, शिवसेनेचे नेते संजय राठोड या नेत्यांवर आधी लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले आहेत. आता राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे.