सचिन वाझेंना आणखी एक दणका : पोलीस दलातून निलंबित

0
212

मुंबई (प्रतिनिधी) : अंबानी स्फोटकं आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अटक झालेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना आणखी एक दणका बसला आहे. वाझे यांना मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश विशेष शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी काढला आहे.

सध्या पोलीस कोठडीत असलेल्या वाझे यांची एनआयएकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच सचिन वाझे यांना एनआयएने शनिवारी अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या निलंबनाची मागणी करण्यात येत होती.

दरम्यान, हिरेन प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवल्यानंतर वाझे यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात दाद मागतली होती. मात्र, त्यांचा अर्ज फेटाळला होता.  अटक केल्यानंतर वाझे यांची तब्बेत बिघडली असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.