मुंबई (प्रतिनिधी) : भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पुण्यातील कोथरूडमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आणखी एका भाजप आमदाराची आर्थिक गैरव्यवहार प्रकऱणी चौकशी होणार आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी २० दिवसांपूर्वी नोटीस पाठवली आहे. त्यामुळे लाड यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

लाड यांच्यावर २००९ मध्ये मुंबई महानगरपालिकेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी २०१४ मध्ये त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. आता प्रसाद लाड यांची चौकशी कऱण्यासाठी नोटीस पाठविण्यात आली आहे.

दरम्यान, जळगाव जिल्हा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकाला कोंडून ठेवून मारहाण केल्याचा आणि त्यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकऱणी गिरीश महाजन यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर लाड यांच्यावरही आरोप ठेवत त्यांना चौकशीसाठी नोटीस पाठविण्यात आल्याने भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे.