वसंतराव मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी होणारी सलोखा रॅली रद्द

0
87

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांचा १३ मार्च रोजी होणारा वाढदिवस दरवर्षी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी कोल्हापुरात सलोखा रॅली व मराठा स्वराज्य भवन संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात येते. मात्र या वेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही रॅली रद्द करण्यात आली आहे.

दरम्यान वाढदिवसानिमित्त डिजिटल बोर्ड न लावता वाचन संस्कृती जपावी म्हणून विविध ग्रंथालयांना  पुस्तके वाटप करण्यात येणार आहे. गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप,  शहरात रस्त्यावर फिरणाऱ्या फिरस्त्यांना ब्लँकेट वाटप करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर आजरा, चंदगड, गडहिंग्लज, भुदरगड, शाहूवाडी, कागल, हातकणंगले, गगनबावडा, करवीर, राधानगरी येथे वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर मुळीक यांचा नागरी सत्कारही लवकरच  करण्यात येणार आहे.

या वेळी सत्कार समितीचे बबनराव रानगे, शशिकांत पाटील,  इंद्रजीत सावंत,  कादर मलबारी, डॉ. संदीप पाटील, बाबा जाफर,  प्रकाश पाटील,  उत्तम जाधव, अशोक माळी उपस्थित होते.