कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न…

0
66

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनची ७३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यामध्ये अहवाल सालात दिवंगत झालेले कांही मान्यवर सभासद, त्यांचे नातेवाईक, कला, क्रिडा, सामाजिक, साहित्य, राजकीय तसेच सीमेवरील शहीद जवांनाना उपस्थितांनी उभे राहून श्रध्दांजली वाहिली.

त्यानंतर मानद अध्यक्ष रणजीत शाह यांनी प्रास्तावीक आणि स्वागत करून अहवाल सालातील कार्याचा आढावा सादर केला. तसेच भविष्यातील नियोजित उपक्रमाची आणि कार्याची माहिती दिली. मोफत उर्जा परिक्षण आणि शुध्द पाणी मिळण्यासाठीचे वॉटर एटीएम कार्डसाठी नांव नोंदणी सभासदांनी करावी असे आवाहन केले. त्यानंतर विषय पत्रिकेतील विषयाप्रमाणे वाचन होवून सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

वीज दरवाढीच्या प्रश्नावर सर्व संघटनांनी एकत्रित येवून कोर्टात केस दाखल करण्याचे ठरले. ईएसआय विषयी प्रखरपणे मालक आणि कामगार यांनी भूमिका घेवून हा विषय सोडविला पाहिजे. संचालक आणि उद्यमवार्ताचे मुख्य संपादक नितीन वाडीकर यांनी उद्यमवार्ता कार्याचा आढावा घेवून जाहीराती देवून सहकार्य करण्याचे आवाहन केले.

यावेळी हर्षद दलाल, दिनेश बुधले, प्रसन्न तेरदाळकर, कमलाकांत कुलकर्णी, अतुल आरवाडे, श्रीकांत दुधाणे, संजय अंगडी, नितीन वाडीकर, बाबासो कोंडेकर, जयदीप मांगोरे, अभिषेक सावेकर, सोहन शिरगावकर आगी उपस्थित होते.