तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

0
94

सिडनी (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियाविरूद्धची दुसरी कसोटी जिंकल्यानंतर टीम इंडिया तिसऱ्या कसोटीसाठी सज्ज झाली आहे. कर्णधार विराट कोहलीच्या गैरहजेरीत मराठ मोळा अजिंक्य राहणे भारताचे नेतृत्व करणार आहे. तर पुनरागमन केलेला आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा याच्या खांद्यावर उपकर्णधाराची धुरा देण्यात आली आहे. सिडनीत होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची आज (बुधवार) घोषणा करण्यात आली. 

या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज नवदीप सैनी याला संधी देण्यात आली आहे. तर  जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील. मयांक अगरवालला विश्रांती देण्यात आली असून त्याच्याजागी रोहित शर्माचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर रोहितकडे उपकर्णधारपदाची जबाबदारीही देण्यात आली आहे. यामुळे रोहितच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.

भारतीय संघ खालीलप्रमाणे –

अजिंक्य राहणे (कर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जाडेजा, आर. अश्विन, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी