‘स्व.राजे विक्रमसिंह घाटगे’ आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा : नवोदिता घाटगे

0
36

कागल (प्रतिनिधी) : स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७३ व्या जयंतीचे औचित्य साधून स्व.राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार सन २०२१ ची घोषणा राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे यांनी केली. यावेळी शाहू ग्रुपच्या मार्गदर्शिका व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे व राजे समरजितसिंह घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी त्या म्हणाल्या, स्व.राजेसाहेब यांना शिक्षणाबद्दल अमाप प्रेम होते. म्हणूनच आम्ही शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकाना त्यांच्या नावाने पुरस्कार देणेची प्रथा सुरू केली आहे. आज स्व.राजेसाहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे जाहीर करीत आहोत.

शाहू ग्रुपच्या मार्गदर्शिका व शाहू साखर कारखान्याच्या संचालिका श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष,भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे  यांच्या संकल्पनेतून  या पुरस्कारांची सुरुवात केली आहे.  शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या चांगल्या कार्याचा सन्मान व्हावा व इतरांना प्रेरणा मिळावी. या उद्देशाने हे पुरस्कार सुरू केले आहेत. कागल, करवीर, आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील शिक्षकांमधून या पुरस्काराची निवड करणेत आली असून प्राथमिक विभागाकडील २९ तर माध्यमिक विभागाकडील २० अशा ४९ शिक्षकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सन्मानचिन्ह मानपत्र व कोल्हापुरी फेटा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारप्राप्त शिक्षक शिक्षिकांचा सपत्नीक व सहपती सत्कार करण्यात येणार आहे.

शाहू ग्रुपच्या मार्गदर्शिका व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे व  राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते सन २०२० व २०२१ या दोन वर्षांच्या पुरस्कारांचे समारंभपूर्वक पुरस्कार वितरण कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच केले जाणार आहे .तारीख व ठिकाण पुरस्कार प्राप्त शिक्षकांना लवकरच कळवीत आहोत.