कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात गणेशोत्सव कालावधीत हद्दपार केलेल्या एका सराईत गुन्हेगाराला बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तुल विक्री करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. ही कारवाई बुधवारी आर. के. नगर येथे करण्यात आली. इम्तियाज शेख असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नांव आहे. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि दोन जिवंत राऊंड जप्त करण्यात आली आहेत.

जवाहरनगर परिसरात राहणारा सराईत गुंड इम्तियाज शेख हा गावठी बनवटीचे पिस्तुल विक्री करण्यासाठी आर. के. नगर परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, प्रमोद जाधव, पोलीस अंमलदार विजय कारंडे, अजय गोडबोले, किरण गावडे, कुमार पोतदार, प्रदीप पवार, पांडुरंग पाटील, संजय पडवळ व संतोष पाटील यांनी केली.