‘त्या’ आक्षेपार्ह दृश्याबद्दल अनिल कपूरचा माफीनामा  

0
87

मुंबई  ( प्रतिनिधी) : दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा एके विरूद्ध एके हा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या सिनेमाच्या एका प्रोमोत अभिनेता अनिल कपूर  भारतीय वायू सेनेच्या गणवेशात दिसत आहे. तसेच  ते चुकीच्या पद्धतीने संभाषण करताना दिसत आहेत. वायुसेनेने या दृश्यांवर आक्षेप घेत  अशा प्रकारच्या दृश्यामुळे वायू सेनेचा अवमान होत आहे. त्यामुळे हा सीन चित्रपटामधून काढून टाकण्याची मागणी वायू सेनेने केली होती. यावर अनिल कपूर यांनी ट्विट करून दिलगिरी व्यक्त केली  आहे.

या चित्रपटामध्ये मी एका वायू सेनेतील अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. माझी मुलगी हरवलेली आहे. त्यामुळे गोंधळलेला बाप जसा वागेल, तशीच प्रतिक्रिया मी दिली आहे. त्यामुळे  कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मला आणी माझ्या पूर्ण टीमला भारतीय वायुसेनेबद्दल नितांत आदर आहे. कोणाचा अपमान करण्याच्या हेतूने ते दृश्य चित्रित केलेले  नव्हते.