इचलकंरजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अनिल डाळ्या यांच्या नेतृत्वाखाली आज (सोमवार) राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा द्यावा. अशी मागणी निवेदनाद्वारे प्रांताधिकाऱ्यांकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख हे महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट दिले होते. अशा खळबळजनक पत्राने महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार हे खंडणीबहाद्दर सरकार असल्याचे दाखवून दिले आहे. ‌या सरकारच्या कालावधीत खुन, मारामारी, साधुसंतांवर हल्ले, महिलांवरील वाढते अत्याचार, थोर विचारवंत, क्रांतिकारी यांचा अवमान करणारे मंत्री आहेत. पण आता राजरोसपणे खंडणी गोळा करणाऱ्या मंत्र्यांची पण भर पडली आहे. अशा मंत्र्यांची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी. तसेच या सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. अशा मागणीचे पत्र प्रांताधिकारी यांना दिले. यावेळी ठाकरे सरकार चले जाव, ठाकरे-पवार-थोरात हप्ता वसुली जोरात, तीन तिघाडी काम बिघाडी अशा घोषणा देऊन सरकारचा निषेध करण्यात आला.

यावेळी सरचिटणीस अरविंद शर्मा, अमर कांबळे, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, जि. प. सदस्य प्रसाद खोबरे, सुनिल महाजन, मिश्रीलाल जाजू, नगरसेवक किसन शिंदे, मनोज हिंगमिरे, मनोज साळुंखे, अमृता भोसले, रणजित अनुसे, धोंडीराम जावळे, बी.डी. पाटील, विजया पाटील, योगिता दाभोळे आदी उपस्थित होते.