बांबवडे (प्रतिनिधी)  :  डोणोली (ता. शाहूवाडी)  गावचे सुपुत्र अनिकेत सहदेव कुंभार यांची  भारतीय सैन्य दलात लेफ्टनंटपदी निवड झाली. त्यानिमित्त त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने गावातून मिरवणूक काढून जाहीर सत्कार करण्यात आला.  

राष्ट्रीय सुरक्षा  अकॅडमीतून (एनडीए)  त्यांनी नुकतेच प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांचा  आजी-माजी सैनिक व अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

अनिकेतला प्रशिक्षक म्हणून योद्धा कमांडो रेस्क्यू फोर्सचे सुभेदार आर. एस. पाटील, जिल्ह्याचे अधिकारी सुरेश राठोड  यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तर अनिकेतला आई, वडिलांचे पाठबळ व प्रोत्साहन मिळाले.

यावेळी सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अशोक पवार,  डीवायएसपी शिवाजीराव जमदाडे,  सुभेदार  आर. एस. पाटील,   हवालदार संजय जांभिलकर,  विश्वास पाटील, अनिल पाटील,   मुख्याध्यापक रविंद्र कुंभार, सरपंच  जितेंद्र यशवंत,  यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर  उपस्थित होते.