रायगड (प्रतिनिधी) : रायगड किल्ल्यावर कर गोळा करायच्या नावाखाली पर्यटक आणि शिवभक्तांकडून जबरदस्तीने पैशांची लूट सुरू आहे, असा आरोप करत पुरातत्व विभागाने उभी केलेली तिकीट खिडकी शिवभक्तांनी दऱीत ढकलून दिली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. यावेळी शिवसैनिक आणि महाडचे आमदार भरत गोगावले उपस्थित होते.

रायगडाच्या चित्त दरवाजाजवळ पुरातत्व विभागाने तिकीट घर उभारले होते. या माध्यमातून पुरातत्व विभागाकडून रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांकडून २५ रुपये करवसुली केली जात होती. मात्र, कर भरुनही गडावर कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याने शिवभक्तांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती. अखेर शिवभक्त आणि शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत तोडफोड करत तिकीटघर दरीत ढकलून दिले.