आणि ‘स्वेरी’ दोन मिनिटे स्तब्ध झाली !

0
21

स्वेरीत ‘हुतात्मा दिन’ साजरा

पंढरपूर प्रतिनिधी-

स्वेरीमध्ये नियमित तास व कार्यालयीन कामकाज नेहमीप्रमाणे सुरु होते, सर्व बाबी सुरळीत सुरु होत्या, लगत होत असलेल्या बांधकामावर मजूर देखील आपल्या कामात मग्न होते. अचानक स्वेरी परिसरात सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. यशपाल खेडकर यांनी उद्घघोषणा केली. …आणि दोन मिनिटांसाठी ‘स्वेरी कॅम्पस’ स्तब्ध झाला. निमित्त होते ‘हुतात्मा दिना’चे !

महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार आणि तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय पुणे यांच्या सूचनेनुसार आज सोमवार, दि.३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता स्वेरीमध्ये दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करून ‘हुतात्मा दिन’ साजरा करण्यात आला.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी आज सोमवार,(ता .३० जानेवारी २०२३) रोजी सकाळी ११:०० वाजता स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरी अंतर्गत असलेल्या इंजिनिअरिंग व फार्मसीच्या पदवी व पदविका महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्य इमारतीच्या लगत सुरु असलेल्या बांधकामावरील मजूरवर्ग, वर्गातील विद्यार्थी, विद्यार्थिनी एकूणच स्वेरीच्या संपूर्ण कॅम्पसने दोन मिनिटे स्तब्ध राहून स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.

दरवर्षी दि.३० जानेवारीला भारतभर ‘हुतात्मा दिन’ साजरा करतात. देशासाठी प्राणांची आहुती देणार्‍या आपल्या शूर शहीदांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस निवडण्यात आला आहे. ३० जानेवारी १९४८ रोजी रोजी बिर्ला हाऊसमध्ये संध्याकाळच्या प्रार्थनेदरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे दरवर्षी ज्या दिवशी बापूंनी अखेरचा श्वास घेतला त्यादिवशी देश ‘हुतात्मा दिन’ साजरा करतो. आज स्वेरीमध्ये झालेल्या ‘हुतात्मा दिन’ या आदरांजलीच्या कार्यक्रम प्रसंगी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम.एम.पवार यांच्या सहकार्याने स्वेरी अंतर्गत असलेल्या इंजिनिअरिंग व फार्मसीच्या पदवी व पदविका महाविद्यालयांतील तसेच एमटेक, एमबीए व एमसीए पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसह सर्व अधिष्ठाता, सर्व प्राध्यापक वर्ग यांनी ‘हुतात्मा दिना’त सहभागी होवून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.