केंद्र सरकारच्या ‘त्या’ आदेशामुळे कोल्हापुरात शिवसेनेतर्फे आनंदोत्सव

0
147

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील अनेक वर्षांपासून मराठी भाषेच्या हक्कासाठी सुरू असणाऱ्या सीमाबांधव, मराठी एकीकरण समिती आणि शिवसेनेच्या लढ्याला अखेर यश आले आहे. बेळगाव महापालिकेवर मराठी फलक लावण्यासह मराठी भाषिकांना सुविधा पुरवा, असे आदेश केंद्र सरकारने कर्नाटक सरकारला दिले आहेत. याबद्दल आज (शनिवार) कोल्हापुरात जिल्हा शिवसेनेच्या वतीने दसरा चौकात साखर, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी शिवसैनिकांनी ‘जय शिवाजी जय भवानी, शिवसेनेचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. बेळगाव, निपाणी सह विविध भागांचा लवकरात लवकर महाराष्ट्रात समावेश व्हावा अशी इच्छा ही या वेळी जिल्हाप्रमुखांनी संजय पवार यांनी व्यक्त केली.

यावेळी जिल्हा प्रमुख संजय पवार, शिवाजी जाधव, पप्पू कोंडेकर, निलेश जाधव, मनोज साळोखे, प्रवीण पालव, अभिषेक बुकशेट यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.