आनंदा कांबळे यांचा मृतदेह वेदगंगा नदीच्या काठावर…

0
286

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील ममदापूर येथील महापूरात वाहून गेलेले आनंदा गणपती कांबळे (वय ७५) यांचा मृतदेह आज (गुरुवार) सकाळी शेणगांव येथील वेदगंगा नदीच्या काठावर आढळून आला.

आनंदा कांबळे हे दि. २७ जुलै रोजी महापुरात वाहून गेले होते. त्यांचा मृतदेह शेणगाव येथील नदीच्या काठावर आढळून आल्यानंतर स्थानिक लोकांनी पोलिस पाटील विजय साळोखे यांच्याशी संपर्क साधला. त्यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यासाठी संजय जाधव, ग्रा.पं. सदस्य भैरवनाथ कुंभार, निखिल सणगर, संजय कोळी, योगेश कोळी यांनी मदत केली.

यावेळी गारगोटी भुदरगड पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक नौकुडकर, एस. एस. सुशांत पाटील, विनायक पाटील यानी पंचनामा करून कांबळे यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.