पोहाळे तर्फ बोरगावच्या वृद्धाचा बा.भोगाव येथे टेंम्पोच्या धडकेत अपघाती मृत्यू

0
127

कळे (प्रतिनिधी) : गुरुवारी दि.१९ रोजी. दुपारी ३.३० वाजता, बाजारभोगाव, ता.पन्हाळा येथील धनलोभे किराणा मालाच्या दुकानासमोर अज्ञात टेम्पोचालकाच्या हौदा टेम्पोने मागील बाजूने ठोकरल्याने दुचाकीवर मागे बसलेल्या बाबू हरी माळवी ( वय ७५, रा.पोहाळे तर्फ बोरगाव. ता.पन्हाळा ) यांचे डोके रस्त्यावरती आपटल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सरदार चंद्राप्पा पाटील यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात टेंम्पोचालकच्या ( एम.एच.१४, ईएम०९२५ ) विरोधात कळे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गुरुवारी दि.१९ रोजी दुपारी ३ : ३० वा.सुमारास पोहाळे तर्फ बोरगाव येथील सरदार चंद्राप्पा पाटील व बाबू हरी माळवी कामानिमित्त बाजार भोगाव येथे आले होते. रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या बँकेत जाण्यासाठी थांबले असता, अज्ञात चालकाने टेम्पो भरघाव वेगाने चालवत जोराने वळण घेत असता, हौदा टेम्पोची मागील बाजू ठोकरल्याने  दुचाकीस्वाराचा तोल गेला, या दुचाकीवर मागे बसलेले बाबू हरी माळवी खाली पडून च्य्नच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, नागारीकांनी त्यांना तात्काळ बा.भोगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. पुढील उपचाराकरिता सीपीआरमध्ये नेले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ.एम.एन.खाडे.करीत आहेत.