शिरोलीत सुमोच्या धडकेत वृद्धेचा जागीच मृत्यू

0
472

टोप (प्रतिनिधी) : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ टाटा सुमोने धडक दिल्याने वृद्धेचा जागीच मृत्यू झाला. नीलाबाई कृष्णात कांबळे (वय ६५, रा. नेज, ता. हातकणंगले) असे या वृद्धेचे नाव आहे. आज (मंगळवार) सायंकाळी साडेचारच्या सुमारास हा अपघात घडला असून याची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झाली आहे.

नीलाबाई कांबळे यांची सून ही पतीसोबत भांडून माहेरी शिरोली येथे आली असल्याने तिला भेटून समजूत काढून गावाकडे घेऊन जाण्यासाठी आली होती, पण तिने येण्यास नकार दिला. त्यामुळे नीलाबाई यांनी गावाकडे परत जाण्याचे ठरवले. त्या शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राकडून दत्त मंदिराच्या बाजूस बस पकडण्यासाठी जात असताना बेंगलोरहून पुण्याच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या टाटा सुमोने (क्र. के ए २५ एम बी ४७१३) ने त्यांना जोरदार धडक दिली. नीलाबाई यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. शिरोली पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.