आजऱ्यात कोरोनामुळे एका वृद्धाचा मृत्यू…

0
412

आजरा (प्रतिनिधी) : आजऱ्यातील मुख्य बाजारपेठेतील ७२ वर्षीय वृध्द व्यापाऱ्यांचा आज (बुधवार) कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या व्यापाऱ्याचा आठवड्यापूर्वी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांची प्रकृती अधिकच ढासळल्यामुळे त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. कोरोनामुळे आजऱ्यातील हा ४४ वा मृत्यू आहे. यामुळे प्रशासन पुन्हा एकदा सतर्क  झाले आहे.