कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापुरात श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज (बुधवार) एक राखी सीमेवरील जवानांसाठी देश रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पाच ते सहा हजार राख्या बाँर्डवरील जवानांसाठी जिल्हा सैनिक अधिकाऱ्यांनाकडे प्रदान करण्यात आल्या.

संसथेचे अध्यक्ष किशोर घाटगे यांनी, गेली २२ वर्ष कारागील युद्धापासून हा उपक्रम सुरू असून दरवर्षी लाख ते दीड लाख राख्या पाठवल्या जातात. परंतु, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने प्रतिकात्मक स्वरूपात कार्यक्रमाचे आयोजन केल्याच सांगितले. सहाय्यक सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त सुभेदार शिवाजीराव पवार यांनी, कोल्हापूर, सातारा ही पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे सैनिकाची पंढरी असून चीनला गलवानमध्ये भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले असल्याचे सांगितले.

तसेच महिला, शालेय विद्यार्थिनींच्या हस्ते राख्या बांधून देश रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ट्रस्टच्यावतीने जमा झालेल्या राख्या प्रदान करण्यात आल्या. तर शहीद जवान, कोराना योद्ध्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी कमलाकर किलकिले, डॉ. संदेश कचरे, सीमा मकोटे,सैनिक वेल्फेअरचे विजय पाटील, रेवती घाटगे,आदिती घाटगे, राजू मकोटे, शिव समर्थ जाएटस,  मालोजी केरकर चैतन्य हास्य क्लब, महालक्ष्मी बचत गट कर्मवीर इंग्लिश मीडियम स्कूल, आदीसह विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.