अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन विश्व सावली चॅरिटेबल ट्रस्ट कडून अनोख्या रीतीने साजरा.

0
137

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारताचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन विश्व सावली चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अनोख्या रीतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये कोरोना काळात अखंड अथक पणाने रुग्णांची सेवा करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

 राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष मोतीलाल चव्हाण, उपाध्यक्ष दिलीप लोखंडे संस्थेचे सदस्य निखिल मोरे, यांच्या हस्ते इंदिरा आय.व्ही.फ चे प्रमुख डॉक्टर संतोष डाफळे, डॉक्टर राहुल साळुंखे आणि इंदिरा आयव्हीएफ टीमचा ध्वज आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी निखील मोरे, शिवाजी मोरे, शुभम, महेश लोखंडे अभिजित लोखंडे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.