सावर्डे बुद्रुक (वार्ताहर) : राजे फाउंडेशनच्या सहकार्याने कुरणी येथील संदीप मारूती पाटील यांना पन्नास हजार आणि अनिल दिनकर पाटील यांच्या बालिकेचे योग्य ते उपचार करुनही मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांना एक लाख रुपये असे एकूण दीड लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून ही रक्कम संबंधिताच्या खात्यावर नुकतीच वर्ग झाल्याची माहिती भाजपाचे जिल्हाप्रमुख समरजितसिंह घाटगे यांनी दिली.

यावेळी संदीप पाटील यांच्या मेंदूच्या ऑपरेशनसाठी समरजितसिंह घाटगे यांनी त्यांच्या कुटुंबियांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५०  हजार दिला. तसेच सिध्दीविनायक ट्रस्ट, मुंबईकडूनही २५ हजारांची मदत देऊ केली. तसेच कुरणी येथीलच अनिल दिनकर पाटील यांच्या तेरा दिवसांच्या बालिकेचे फुफुसाच्या आजारात दुर्देवी मृत्यू झाला. त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाख तर सिद्धिविनायक ट्रस्ट, मुंबईकडून पंचवीस हजारांची मदत मिळवून दिली.

त्यामुळे समरजितसिंह घाटगे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल दोन्ही पाटील कुटुंबीयांनी कृतज्ञता व्यक्त केली. तर घाटगे यांनी अनिल पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. तसेच मयत बालिकेच्या कुटुंबीयांचे सांत्वन समरजितसिंह घाटगे यांनी केले.

यावेळी माजी उपसरपंच लक्ष्मण जत्राटे, विनोद पाटील, शामराव मांगोरे, कृष्णात पाटील, भाऊसाहेब पाटील, विजय माने, सचिन पाटील, प्रवीण पाटील, अनिल हंचनाळे, तुकाराम पाटील आदी उपस्थित होते.