रांगोळी (प्रतिनिधी) : केरळमधील त्रिसुर येथे झालेल्या पॅरा मास्टर्स  नॅशनल इन डोअर बॅडमिंटन स्पर्धेत रांगोळी गावातील अमोल आप्पासो सकांन्ना याने एकेरित सुवर्ण तर दुहेरीमध्ये रौप्य पदक पटकावले. त्यामुळे रांगोळी गावाच्या शिरेपेचात मानाचा तुरा खोवला आहे.  

अमोलने एकेरी स्पर्धेमध्ये तामिळनाडूला २१-१७, २१-१६ फरकाने हरवत सुवर्णपदक पटकावले. तर दुहेरी स्पर्धेत योगेश पोवार याच्या बरोबर रौप्यपदक पटकाविले. अमोल हा हुपरी बॅडमिंटन क्लबमध्ये सराव करत आहे. त्याला अतुल धनवडे, नारायण मडके, संतोष कुंभार, केशव वाईंगडे यांचे मार्गदर्शन लाभले. अमोलच्या या कामगिरीमुळे रांगोळी गावात जल्लोष साजरा झाला.