कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरमधील अंबिका पॅथॉलॉजि लॅबोरेटरीने जानेवरी २०२० मध्ये एनएबीएल (राष्ट्रीय परीक्षण व अंशसंशोधन प्रयोगशाळा प्रत्यायन बोर्ड, भारत) मानांकन प्राप्त केले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ही पहिलीच खाजगी मानांकित लॅबोरेटरी झाली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावरील आय एलसी-एमआरए मानांकन देखील प्राप्त झाली आहेत. अशी माहिती लॅबोरेटरीचे डॉ. आर. एस. पाटील यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषदेत सांगितले.

डॉ. पाटील म्हणाले की, अंबिका पॅथॉलॉजी लॅबोरेटरी ही गेली २५ वर्षे कोल्हापुरात कार्यरत आहे. अंबिका लॅब ही कोल्हापूर जिल्ह्यातील एक नामांकित आणि अत्याधुनिक लॅब आहे. अत्याधुनिक उपकरणे बसविल्यामुळे अतिशय कमी वेळेत रुग्णांना रिपोर्ट प्राप्त होणार आहेत. एनएबीएल ही भारत सरकारच्या विज्ञान अन तंत्रज्ञान विभागाअंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे. जी पॅथॉलॉजि लॅबच्या गुणवत्तांची आणि तांत्रिक क्षमतेची तृतीय पक्ष मूल्यांकन प्रदान करते. हे मानांकन मिळाल्यामुळे रुग्णांच्या हक्कांचा आदर आणि त्यांचे संरक्षण होते. यामुळे रुग्णांना पुरवलेल्या सेवांबरोबरच नागरिकांचा आत्मविश्वास वाढतो.

अंबिका लॅबला एनएबीएल आणि आयसीएमआर नामांकन मिळाले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या आरएनए, डीएनए सारख्या आरटीपीसीआर तपासणी त्यामध्ये कोव्हिड, डेंग्यू, चिकन गुनिया, कावीळ सारख्या आदी चाचण्या अंबिका लॅबमध्ये होत असल्यामुळे पुणे किंवा मुंबई या ठिकाणी रुग्णांना जाण्याची गरज नाही.

अंबिका लॅब ही पश्चिम महाराष्ट्रातील एक मॉडर्न लॅंब आहे. लॅबमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाबरोबर उच्च शिक्षित अनुभवी, प्रशिक्षित आणि व्यावसायिक डॉक्टर्स व कर्मचारी कार्यरत आहेत. अंबिका पेंथॉलॉजी लॅबोरेटरीने कोल्हापूरकरांना अनेक चाचण्या अगदी अत्यल्प दरात व त्याच दिवशी उपलब्ध करून दिल्याने पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांचा मौलिक वेळ आणि पैसे कमी होण्यास मदत झाली आहे. कोल्हापूरमधील अंबिका लॅब ही डायग्रोस्टिक क्षेत्रातील एक प्रगतीदर्शक मार्गावर यशस्वी वाटचाल करणारी लॅब म्हणून नेहमीच अग्रेसर राहील, असा विश्वास डॉ. पाटील यांनी व्यक्त केला.