आंबर्डे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध..!

0
334

कळे  (प्रतिनिधी)  :  पन्हाळा तालुक्यातील पश्चिम विभागामधील आंबर्डे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात आली. पन्हाळा तालुक्यातील  ही सर्वात पहिली बिनविरोध ग्रामपंचायत ठरल्याने कौतुक  केले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील  अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या असून त्यापैकी ४७ गावामध्ये  निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले आहे.

पन्हाळा तालुक्यात आंबर्डे गावातील नागरिकांनी एकत्र येत तालुक्यात पहिली बिनविरोध ग्रामपंचायत करण्यात बाजी मारली.  यामुळे संपूर्ण गावाची एकजूट दिसून आली. त्यामुळे धामणी खोऱ्यातून या गावातील नागरिकांचे कौतुक होत आहे.

सुरेश (काका) बोरवणकर,  आक्काताई कृष्णा पाटील,  शीतल भीवाजी पाटील,  सिंधू प्रकाश गुरव, गीता प्रकाश कांबळे, आनंदा यशवंत कांबळे,  सदाशिव चंद्रापा गुरव अशा एकूण सात सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  यासाठी आंबर्डे गावचे ज्येष्ठ नेते पांडुरंग पाटील,  प्रकाश (पिंटू) पाटील,  कृष्णात पाटील, बाबुराव कांबळे, बाजीराव पाटील (रेशन दुकानदार),  पोलीस पाटील रामदास पाटील,  केरबा पाटील आदी लोकांनी विशेष प्रयत्न केले.