यापुढे आश्चर्यकारक धक्के देऊ..!: खा. उदयनराजेंच्या भेटीनंतर नाना पटोलेंचे सूचक विधान   

0
245

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोल आणि राज्यसभेतील भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांची दिल्लीत भेट झाली. या दोघांची काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थाबाहेर भेट घेतली. या भेटीनंतर नाना पटोले यांनी ‘जस्ट वेट अॅण्ड वॉच..’ अशी सूचक प्रतिक्रिया दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर नाना पटोले  काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या सदिच्छा भेटीसाठी दिल्लीला गेले होते. दिल्लीत असताना खासदार उदयनराजे यांनी पटोले यांची सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर भेट घेतली. या भेटीचा फोटोही समोर आला आहे. या भेटीदरम्यान, प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल नाना पटोले यांचे अभिनंदन केल्याचे उदयनराजे यांनी सांगितले. तर दुसरीकडे काँग्रेसला बळकटी देण्यासाठी इतर पक्षातील नेत्यांना सामावून घेण्याच्या दिशेने काम सुरू आहे. ‘जस्ट वेट अॅण्ड वॉच..’ पुढे आश्चर्यकारक धक्के देऊ, असे सूचक वक्तव्य पटोले यांनी केले आहे.