ज्येष्ठांच्या आशीर्वादामुळेच महायुतीला उत्तम यश मिळेल : आ. अमल महाडिक

0 2,417

गांधीनगर (प्रतिनिधी) : मतदारसंघातील सर्वांच्या शुभेच्छा आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद यामुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत उत्तम यश मिळेल हे निश्चित असल्याचे प्रतिपादन आ. अमल महाडिक यांनी केले. ते गांधीनगर येथील मतदारांच्या गाठीभेटीप्रसंगी बोलत होते.

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामधील शाहूनगर, पोवार गल्ली, दत्त गल्ली, माऊली चौक, कोरे गल्ली, पंत गल्ली, गांधीनगर येथे आ. अमल महाडिक यांनी पदयात्रा काढून मतदारसंघातील ज्येष्ठांची गाठीभेटी घेतली.

आ. महाडिक म्हणाले की, मागील पाच वर्षात झालेल्या विकास कामांना, भाजपाच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या धोरणाला, सर्व समाज घटकांच्या उत्कर्षाला आपला भक्कम पाठिंबा आहे. सर्व वयोगटातील नागरिकांनी या भेटींना भरभरून प्रतिसाद दिला असल्याचेही ते म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More