माजी विद्यार्थ्याकडून वालावलकर हायस्कूलला शैक्षणिक साहित्याचे वाटप

बोरपाडळे (प्रतिनिधी) : कोल्हापूर शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलचा माजी विद्यार्थी शैलेश कुंभार याने आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करून शाळेतील गरजू, गरीब व होतकरू २५ विद्यार्थ्यांना लाभ होईल अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. प्रशालेचे मुख्याध्यापक महावीर मुड बिद्रीकर यांनी या भेटीचा स्विकार केला.

यावेळी केलेल्या मनोगतात त्यांनी ज्यावेळी विद्यार्थांची दानाची उंची वाढते, त्याचवेळी शाळेचीही उंची वाढत असते असे मत व्यक्त केले. यावेळी बहुसंख्य माजी विद्यार्थी, ज्येष्ठ शिक्षक सुरगोंडा पाटील, ग्रंथपाल मृदुला शिंदे, सरीता पोवार, पल्लवी गंगधर, सदाशिव-हाटवळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Live Marathi News

Recent Posts

कळे येथे अवैध दारू विक्री करणाऱ्यास अटक : २.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

कळे (प्रतिनिधी) : घरात अवैधरित्या देशी-विदेशी…

7 hours ago

बी, सी, डी वॉर्डसह उपनगरात सोमवारी पाणी नाही येणार….

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील ए,…

9 hours ago

पणोरे ग्रामस्थांतर्फे शहिदांना आदरांजली…

कळे (प्रतिनिधी) : पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद…

9 hours ago

कोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासांत १० जणांना लागण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल…

9 hours ago