मुंबई (प्रतिनिधी) : कॉमेडियन भारती सिंहला अटक केल्यानंतर आता तिचा पती हर्ष लिंबाचिया याला केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अटक केली आहे. चौकशीदरम्यान, भारतीने अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर एनसीबीने तिच्याविरोधात ‘एनपीडीएस’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे . त्यानंतर हर्षलाही अटक करण्यात आली आहे.

भारती सिंहच्या घरात अमली पदार्थ आढळून आल्यानंतर एनसीबीने शनिवारी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.एनसीबीने शनिवारी सकाळी खार दांडा परिसरात छापा घातला. कारवाईत अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून १५ एलएसडी डॉट्स, ४० ग्रॅम गांजा आणि नायट्रोझेपाम औषध आदी अमली पदार्थ एनसीबीने जप्त केली होती. त्यांच्या चौकशीतून भारतीचे नाव समोर आले  होते.