मुंबई (प्रतिनिधी) : धडाकेबाज विधानासाठी ओळखणारे राष्ट्रवादीचे नेते व  गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. अल्लाह को मालूम था २०११ में कोरोना आनेवाला है. तभी मुंब्रा में २०१९ में कब्रस्तान बना, असे आव्हाड यांनी म्हटले आहे. आव्हाड यांच्या हस्ते मुंब्रा येथील एका नगरसेविकेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी  ते बोलत होते. 

कोरोनाचे संकट येणार हे अल्लाहला २०११ मध्येच दिसले होते. म्हणून २०१९ ला कब्रस्तान बनले, असे वक्तव्य करून मुस्लिम समाजाला खूश करण्याचे राजकारण आव्हाड यांना करायचं आहे का?, असा सवाल विरोधकांनी केला आहे. आव्हाडांच्या या वक्तव्याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. तुम्ही म्हणता जे काही होतं ते अल्लाच करतो. हे कब्रस्तानही अल्लानेच बनवलं आहे, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे. आव्हाड यांच्या या वक्तव्यावर संमिश्र प्रतिक्रियांचा सूर उमटू लागला आहे. दरम्यान, माझा फोन टॅप होत असल्याचा मला संशय येत आहे. विशेषत: माझ्या व्हॉट्सअॅप कोणत्यातरी संस्थेकडून निगराणी ठेवली जात आहे, असे ट्वीट आव्हाड यांनी केले आहे.