कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापार, व्यवसाय सोमवारपासून (ता.१९ जुलै) सुरू करण्याचा आदेश काढण्यात येणार आहे, अशी ग्वाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाला दिली. अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. जिल्हा फेज चारमधून फेज तीनमध्ये आला आहे. व्यापार, व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने मंत्री टोपे यांची शुक्रवारी सकाळी भेट घेतली. यावेळी टोपे यांनी व्यापाऱ्यांना हे आश्वासन दिल्याचे गांधी यांनी सांगितले. यामुळे व्यापारी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.