कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्री अंबाबाई मंदिरात यंदा नवरात्रोत्सवातील सर्व कार्यक्रम प्रती वर्षाप्रमाणे होणार आहेत. मंदीर दर्शनासाठी खुले नसले तरी नऊ दिवस सर्व विधी करण्यात येणार आहे. त्याचे भाविकांना याचे  दर्शन लाईव्ह करण्यात येईल, अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिली. यासंबंधीचे पत्रही त्यांनी दिले. 

   

कोरोनामुळे सर्व मंदिरे बंद आहेत. अंबाबाई मंदीरही दर्शनासाठी बंद आहे. तरीही नवरात्रोत्सव साजरा करण्याची तयारी देवस्थान समितीचे प्रशासन करत आहे. मंदीराची रंगरंगोटी सुरू आहे. स्वच्छता केली जात आहे. नऊ दिवसांचे कार्यक्रम, विधीची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.

यावेळी देवस्थान समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, रविंद्र जाधव, विजय पोवार, मिलिंद घेवारे आदी उपस्थित होते.